शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘किरीट का कमाल’ मथळ्याखाली त्यांनी ट्विटची मालिका सुरू केली आहे. त्याच मालिकेतील एक फोटो आता पुन्हा त्यांनी एक ट्विट केला आहे. त्यासोबत त्यांनी उद्या धमाका होणार असल्याचे संकेत दिले आहेत. संजय राऊत यांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
Watch this space tomorrow!
जय महाराष्ट्र!@PMOIndia @BJP4India @BJP4Maharashtra @dir_ed @KiritSomaiya @AUThackeray @PawarSpeaks @sanjayp_1 @ShelarAshish @ameetshah
@ pic.twitter.com/Ff8dIcjisA— Sanjay Raut (@rautsanjay61) May 10, 2022
संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी ‘किरीट का कमाल-2 असे लिहून एक ट्विट केले होते. पश्चिम बंगालमधील मेट्रो डेअरी केसचा तपास ईडी आणि सीबीआय करत आहे. याच मेट्रो डेअरीने लाखो रुपयांची देणगी किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला दिली. आप क्रोनोलॉजी समझिये, हिसाब तो देना पडेगा भाई’ असे त्यांनी त्या ट्विट मध्ये म्हटले होते. त्यामुळे आता उद्या नक्की कोणता धमाका होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


























































