
डिजिट इन्शुरन्सने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण रिटर्न प्रीमियममध्ये 5,268 कोटी रुपयांची नोंद केली असून ज्याचा एकाच वर्षात 5 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल आहे. कंपनीने पाच वर्षांपेक्षा कमी ऑपरेशनच्या कालावधीत ही कामगिरी केली. आपल्या व्यवसायातील मोटार, प्रॉपर्टी आणि हेल्थ लाइन्सच्या नेतृत्वांतर्गत कंपनीने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 62 टक्के वाढ नोंदविली तर एकूण इंडस्ट्रीमध्ये 10.9 टक्क्यांची वाढ झाली. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सर्व उत्पादनांमध्ये डिजिटने 77.6 लाखांपेक्षा जास्त विक्री केली, जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 40 टक्क्यांनी जास्त आहे.



























































