
नेवासा तालुक्यात शंकरराव गडाख यांच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून विकास कामांसाठी उपलब्ध होत असलेला निधी यामुळे विकासकामांना साथ देण्यासाठी देवगाव येथील भाजप कार्यकर्त्यांनी आज जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.
भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या गावातील भाजप कार्यकर्ते उत्तमराव गायकवाड, गोरक्षनाथ गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, कृष्णा गायकवाड, ईश्वर गायकवाड, निखिल गायकवाड, स्वप्निल गायकवाड, रामदास गायकवाड, अंकुश गायकवाड, आदिनाथ गायकवाड, सोपानराव भुजबळ, शांताराम भुजबळ, रावसाहेब भुजबळ, ज्ञानेश्वर गायकवाड, कानिफनाथ भुजबळ, निखिल गायकवाड, रोहिदास वाल्हेकर, रमेश नेटके यांच्यासह देवगाव येथील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे सर्वांचे नामदार गडाख यांनी शिवसेना पक्षात स्वागत केले.
यावेळी माजी आमदार पांडुरंगजी अभंग, काशिनाथ आण्णा नवले, नेवासा बाजार समिती सभापती डॉ. शिवाजीराव शिंदे, माजी पंचायत सदस्य. उपसभापती तुकाराम पाटील मिसाळ, प. स. सदस्य अजित मुरकुटे, अशोकराव मिसाळ, अशोकराव मंडलिक, बबनराव पिसोटे, एकनाथ कावरे, अमोल अभंग, गोरक्षनाथ निकम, अशोक शेठ गुंदेचा, कचरूशेठ गुंदेचा, महेशराव निकम, पाडळे गुरुजी, भाऊसाहेब मोरे, रावसाहेब निकम, भाऊराव आगळे, दिपक निकम, पमा भाऊ शिंदे, खुदा भाई, शब्बीर शेख, बाबासाहेब पाडळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.




























































