करायला गेले काय अन् झाले भलतेच; सुप्रिया सुळे यांचा राज ठाकरे यांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सध्या भोंग्याचं राजकारण सुरू आहे. करायला गेले काय अन् झालं भलतंच, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हाणला.

नाशिक येथे सनदी लेखापालांच्या बैठकीत रविवारी त्या म्हणाल्या, राज्यातल्या भोंग्याचं राजकारण सर्वांनीच पाहिलं. करायला गेले काय अन् झालं भलतंच, अशी त्यांची गत आहे. त्यांचा भोंगा बंद करायला गेले अन् शिर्डीचाच भोंगा उतरला, असा टोला त्यांनी मनसेला हाणला.

केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह पोस्टबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, कुणाच्याही वडिलांनी मरावे अशी भावना व्यक्त करणे चुकीचे आहे. प्रत्येकाची संस्कृती असते. माझ्यावर असे संस्कार नाहीत. या पोस्टबाबत योग्य भूमिका घेतल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही खासदार सुप्रिया सुळे यांनी आभार मानले. अशा विकृतींविरुद्ध सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यायला हवे, कुणाच्याही बाबतीत अशी विकृत भावना कोणी व्यक्त केली तर तिला विरोध करायला मी पुढे राहीन, असेही त्यांनी स्पष्ट केले.