जैन समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहिंसा परमोधर्म, जगा आणि जगू द्या, या तत्त्वांचे आचरण करून संस्कृतीशी एकरुप झालेल्या जैन समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सांगली येथे दक्षिण भारत जैन सभेच्या महाअधिवेशनात ते बोलत होते.

या कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, शाखाप्रमुख संदीप चिवटे आणि दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जपणाऱया जैन समाजाने दातृत्वातून आपली वेगळी ओळख निर्माण केली असून समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पावसाळी अधिवेशनापूर्की सर्क संबंधितांची मुंबई येथे बैठक घेऊन समाजाचे प्रश्न मार्गी लाकले जातील, असेही अजित पवार म्हणाले. जैन समाजाच्या विकासासाठी अन्य राज्यात राबविण्यात येत असलेल्या योजनाही महाराष्ट्र राज्यात राबवून या योजनांचा लाभ जैन समाजाला मिळवून दिला जाईल, असा विश्वासही त्यांनी क्यक्त केला. याप्रसंगी अजित पवार यांच्या हस्ते माजी मंत्री कलाप्पाण्णा आकाडे यांना शिक्षण सेकक पुरस्कार तर स्व. बापुसाहेब बोरगावे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.