सोन्याला पुन्हा झळाळी; चांदीच्या किमतीतही वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोन्या-चांदीच्या दरात या आठवड्यात वाढ झाली आहे. जागतिक आर्थिक वातावरण आणि शेअर बाजारातील चढउतारामुळे सोन्या चांदीच्या दरातही चढउतार होत आहे. या आठवड्यात सोन्याचांदीच्या दरात वाढ झाली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात 722 रुपये प्रती 10 ग्रॅम अशी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 1962 रुपये प्रतिकिलो अशी वाढ झाली आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला 24 कॅरेट सोन्याचा दर 50,305 रुपये प्रती 10 ग्रॅम होता. त्यात आठवड्याभरात वाढ होत तो शुक्रवारी 51,027 रुपये प्रती 10 ग्रॅमपर्यंत वाढला आहे. तर चांदीची किंमत आठवड्याच्या सुरुवातीला 60,042 रुपये होती. ती शुक्रवारपर्यंत 62,004 रुपये प्रती किलोपर्यंत आली आहे.

विशेष म्हणजे सोन्याच्या आयातील 2021-22 या वर्षात 33.34 टक्के वाढ होत 46.14 अब्ज डॉलरपर्यंत पोहचली आहे. 2020-21 या वर्षात सोन्याची आयात 34.62 अब्ज डॉलर होती.