
मानवी जीवन अधिक सुखकर आणि आरामदायी करण्यासाठी शास्त्रज्ञांचे विविध प्रयोग सुरू असतात. त्यातून वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित होत आहेत. अलीकडेच नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील इंजिनीअर्सच्या टीमने नुकताच जगातील सर्वात छोटय़ा खेकडा रोबोचा शोध लावलाय. या रोबोचा आकार मुंगीपेक्षाही लहान असल्याचे सांगण्यात आलंय.
हा रोबो पेकेटोस खेकडय़ाच्या आकारामध्ये बनवण्यात आलाय. पेकेटोस हे लहान खेकडे असतात, जे फक्त अर्धा मिलिमीटर लांबीचे असतात. हे खेडके वाकू शकतात, वळू शकतात, सरपटू शकतात, चालतात आणि अगदी उडय़ादेखील मारू शकतात. संशोधकांनी मिलिमीटर आकाराचे रोबोट्सदेखील तयार केले आहेत, पण याबाबत शास्त्रज्ञ अद्याप त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात संशोधन करत आहेत. संशोधकांना आशा आहे की, त्यांच्या तंत्रज्ञानामुळे त्यांना जगातील सर्वात लहान रोबोट विकसित करण्यात मदत होईल, जे अतिशय छोटय़ातल्या छोटय़ा जागेत काम करू शकतील.
मुंगीपेक्षाही लहान असलेला हा रोबोट क्लिष्ट मशिनरी, हायड्रॉलिक किंवा विजेवर चालत नाही. त्याऐवजी त्याची शक्ती शरीराच्या इलॅस्टिसिटी आणि लवचिकतेतून येते. शस्त्रक्रिया सहाय्यक म्हणूनही उपयोगी
सूक्ष्म रोबोट्सचा उपयोग रक्तस्राव थांबवण्यासाठी, कर्करोगाच्या गाठी काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया सहाय्यक म्हणून होऊ शकतो. हा रोबोट अधिक विकसित करण्याचे काम सुरू असून, प्रामुख्याने शैक्षणिक हेतूसाठी तयार केला असल्याची माहिती संशोधकांचे नेतृत्व करणारे जॉन राजर्स यांनी दिली.































































