
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी गुजरात टायटन्स व राजस्थान रॉयल्स या संघांमधील फायनलच्या थरारापूर्वी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर समारोप सोहळा रंगला. बॉलीवूड स्टार रणवीर सिंह आणि ‘ऑस्कर’ पुरस्कार विजेते ए. आर. रेहमान यांनी आपल्या आदकारी आणि कलाकारीने उपस्थित सव्वा लाखहून अधिक उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. 45 मिनिटांपर्यंत रंगलेल्या या समारोप सोहळय़ादरम्यान हिंदुस्थानी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (75 वर्षे) आणि आयपीएलच्या 15 वर्षांतील संस्मरणीय क्षणही दाखविण्यात आले.






























































