
लातूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. निलंगा तालुक्यातील मौजे पानचिंचोली ते कवठा पाटी या रस्त्यावर एका व्यक्तीचा मृतहेद आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
लातूर ते जहिराबाद या मार्गावरील निलंगा तालुक्यातील पानचिंचोली ते कवठा पाटी या दरम्यान अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सकाळी आढळून आला. निर्घृणपणे हत्या करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिलेला असावा, अशी शंका व्यक्त केली जात होती. मृत व्यक्ती साधारणपणे 45 वर्षे वयाचा असावा असे सांगितले जात आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झालेली होती. मयताची ओळख पटलेली नव्हती. हत्या कोणत्या कारणासाठी झाली, कोणी केली, मृत व्यक्ती कोण आहे या सर्व गोष्टींचा तपास आता पोलीसांना करावा लागेल.


























































