
तालुक्यातील बहुतांशी पेट्रोल पंप दोन-तीन दिवसांपासून बंद असल्याने पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, इंधन टंचाईमुळे खरीप हंगामातील शेती मशागत खोळंबली आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात केली. पेट्रोल पंप मालक आक्रमक झाले आहेत. यातच राज्य सरकारनेही दरांमध्ये कपात केली. या साऱ्या घडामोडींमध्ये तालुक्यातील पंपचालकांनी पेट्रोल-डिझेलची खरेदी न केल्यामुळे पेट्रोल-डिझेल पंप बंद आहेत. ऐन शेती मशागतीच्या काळात शेतकऱ्यांपुढे इंधन टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे शेतीची अनेक कामे खोळंबली आहेत.



























































