
येत्या रविवारी 5 जून 2022 रोजी रेल्वेच्या पश्चिम, मध्य व हार्बर या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी कोणताही प्लान बनवायच्या आधी मेगाब्लाॉकबाबत माहिती करून मगच घराबाहेर पडा.
पश्चिम रेल्वे –
- पश्चिम रेल्वेवर जंबो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 11.00 ते 1.30 पर्यंत बोरिवली ते कांदिवली दरम्यान जंबो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. य़ा दरम्यान काही ट्रेन फक्त गोरेगाव पर्यंत चालविण्यात येणार आहेत. पोईसर ब्रिजचं काम करण्यात येणार असल्याने हा मेगाब्लॉक घेण्यता येणार आहे.
मध्य रेल्वे –
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. नियोजित थांबे घेऊन आपल्या गंतव्य स्थानकावर पंधरा मिनिटे उशिराने पोहोचतील.
- सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. नियोजित थांबे घेऊन आपल्या गंतव्य स्थानकावर पंधरा मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर रेल्वे –
- पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत
(बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून) - सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
- सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि तसेच सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलकडे सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरूळ दरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा सुरू राहतील
ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ – खारकोपर दरम्यान उपनगरीय सेवा सुरू राहतील.



























































