रत्नागिरी – क्रांतीनगर येथे जुन्या वादातून तरुणावर तलवारीचे वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर रिक्षा थांब्यानजिक जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. धारदार तलवारीने तरुणावर सपासप तीन वार करण्यात आले.

या हल्ल्यात राजेंद्र विटकर (वय 32, क्रांतीनगर) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या हातावर आणि पायावर गंभीर वार झाले आहेत. हल्ला झाल्याच्या ठिकाणी रक्ताचा सडा पडला असून या हल्ल्यातून संबंधित तरुण थोडक्यात बचावला आहे.

हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. हल्ल्यानंतर जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच प्रभारी शहर पोलिस निरीक्षक शिरीष सासने, उपविभागीय पोलिस अधिकारी वाघमारे व अन्य सहकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.