भरधाव कारने 7 जणांना चिरडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 बिहारमधील बगाहा येथे भरधाव असलेली ब्रीझा कार एका घरात घुसली आणि तिने सातजणांना चिरडले. यामध्ये तीनजणांचा जागीच मृत्यू झाला असून, चारजणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांनी आधी गाडीची तोडफोड केली, त्यानंतर ‘रास्ता रोको’ केला. मंगळवारी सकाळी 7 वाजता हा अपघात झाला.