Video – नुपूर शर्मा प्रकरण : पश्चिम बंगालमध्ये संतप्त आंदोलकांनी भाजपचे कार्यालय पेटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या विधानामुळे देशाच्या अनेक भागात तणाव निर्माण झाला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू कश्मीर, पश्चिम बंगाल येथे आंदोलनकर्त्यांनी शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर दगडफेक केल्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.

दरम्यान आता संतप्त आंदोलनकांनी पश्चिम बंगालच्या हावडा शहरातील भाजपचे कार्यालय जाळल्याचे समोर आले आहे. भाजप नेते अनिर्बान गांगुली यांनी उद्धस्त झालेल्या भाजप कार्यालयाचा व्हिडीओ ट्विट करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

”ते लोकं त्यांचं ऐकतात व त्यांना मतदान करतात. हावडा ग्रामीण जिल्ह्यातील भाजप कार्यालयात तोडफोड करून त्याला पेटवून देणाऱ्यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओळख पटवून त्यांना अटक केली पाहिजे. यावर त्या गप्प का आहेत?” असा सवाल अनिर्बान यांनी त्यांच्या ट्विट मधून केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम नागरिकांनी हावडा जिल्ह्यातील रस्ते तसेच खडगपूर रेल्वेमार्गावरील वाहतूक देखील रोखली होती. दासनगर रेल्वे स्थानकाजवळ तीव्र निदर्शने करण्यात आली होती. तसेच डोमजूर पोलीस ठाण्यावर दगडफेक करून ते पेटवून दिलेले. त्यानंतर उलुबेरियातील भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली.

कुठे… काय घडले?

उत्तर प्रदेश : प्रयागराज, सहारनपूर, बाराबंकी, मुरादाबाद, उन्नाव, देवबंद आदी अनेक शहरांत तीव्र निदर्शने करण्यात आली. सहारनपूरमध्ये तोडपह्ड आणि प्रयागराजमध्ये दगडफेक झाली. पीएसीचा ट्रक पेटवण्यात आला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

दिल्ली : जामा मशिदीबाहेर 1500 हून अधिक लोकांनी निदर्शने केली. नमाज पठण केल्यानंतर लगेच मुस्लिम बांधवांनी नूपुर शर्मा यांच्या अटकेसाठी व त्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. जवळपास तासभर ही निदर्शने सुरू होती.

कर्नाटक : बेळगावच्या पर्ह्ट रोडवरील मशिदीजवळ विजेच्या तारांना नूपुर शर्मा यांचा पुतळा लटकवण्यात आला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ तो पुतळा हटवला.

बंगाल : कोलकाता आणि हावडा शहरात मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरून नूपुर शर्मांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. जमावाने दुकाने बंद करण्याचे आवाहन करताच परिसरात तणाव निर्माण झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत अश्रूधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या.

तेलंगणा : हैदराबादमध्येही नमाजानंतर निदर्शने करण्यात आली. मक्का मशिदीच्या आवारात शेकडो मुस्लिम बांधव एकवटले. यावेळी पोलीस बळाचा वापर करून निदर्शकांना पांगवण्यात आले. परिसरात पोलीस आणि सीआरपीएफचे जवान तैनात आहेत.

पंजाब : नूपुर शर्मा आणि जिंदाल यांच्या अटकेच्या मागणीसाठी लुधियाना जामा मशिदीतर्फे निदर्शने करण्यात आली. नमाजानंतर शर्मा आणि जिंदाल यांचा पुतळा जाळण्यात आला.

मध्य प्रदेश : मुस्लिम समाजबांधवांनी शर्मा आणि जिंदाल यांच्या अटकेसाठी घोषणाबाजी केली. दोन्ही भाजप नेत्यांचा निषेध करण्यात आला.

जम्मू-कश्मीर : श्रीनगरसह अनेक शहरांत नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. ठिकठिकाणी शेकडोंच्या जमावाने शर्मा यांच्या निषेधाचे फलक झळकवले. खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनाने मोबाईल इंटरनेट बंद केले. कश्मीर खोऱयातील संवेदनशील भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

गुजरात : बडोदा आणि सुरतनंतर शुक्रवारी अहमदाबादमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले. तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन लाल दरवाजा आणि तीन दरवाजा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.