
पाऊस आणि प्रेमाचे अतूट नाते आहे. नुकतीच राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. या रोमॅण्टिक वातावरणात भर घालण्यासाठी सोनी मॅक्स वाहिनी प्रेमपटांचा खजीना घेऊन आली आहे. ज्याचा आनंद तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घेऊ शकता.
शाहिद कपूर आणि कीयारा अडवाणी यांचा गाजलेला ‘कबीर सिंह’ हा चित्रपट 10 जूनला दाखविण्यात आला. तर ऍक्शन आणि रोमान्सचा तडका असलेला ‘केजीएफ’ 12 जूनला पाहता येईल. गौतम आणि यामिनीची प्रेमकहाणी अडथळ्यांनी भरलेली कहाणी ‘वर्ल्ड फेमस लव्हर’ 11 जून रोजी तर मि. परफेक्शनिस्ट आमीर खान आणि करिनाचा ‘थ्री एडियट’ हा चित्रपट 14 जूनला प्रसारित होईल. हे सर्व चित्रपट रात्री आठ वाजता पाहता येतील.
























































