Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’14 जून’चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Tuesday, June 14, 2022)

आईचा आदर करा. पैसे खर्च करण्याची वेळ फारच कमी प्रमाणात लागेल. सगळ्यांशी प्रेमाने वागा. जोडीदाराशी फोनवरून बोलण्यासाठी बराच वेळ मिळेल. इच्छाशक्ती जबरदस्त ठेवा. किराणा मालाची खरेदी कराल. मन:शांतीसाठी प्रयत्न करा.
शुभरंग : पिवळा

वृषभ (TAURUS – Tuesday, June 14, 2022)
आहारात शुद्ध मधाचा वापर करा. जोडीदार तुमच्यावर खूश होईल. डोळ्यांची काळजी घ्या. मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी प्रयत्न करा. प्रिय व्यक्तिकडून आवडती भेटवस्तू मिळेल. सकाळची सूर्यकिरणे 10 मिनिटे अंगावर घ्या. नातेवाईकांना वेळ द्याल. आरोग्याची काळजी घ्याल. कला जोपासा.
शुभरंग : आकाशी

मिथुन (GEMINI – Tuesday, June 14, 2022)
पिवळ्या रंगाचा पोषाख परिधान करा. आजचा दिवस मनोरंजनाचे कार्यक्रम बघण्यात घालवाल. सहकाऱ्यांचे मत विचारात घ्या. मोबाईलवर अनावश्यक गप्पा मारण्यात वेळ घालवू नका. सदाफुलीचे झाड अंगणात लावा. आहाराची पथ्ये पाळावी लागतील. सौंदर्य प्रसाधन वापरताना तज्ज्ञांचा सल्ला घ्याल.
शुभरंग : गुलाबी

कर्क (CANCER – Tuesday, June 14, 2022)
पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. आरोग्य चांगले राहिल. भाऊ बहिणीच्या मदतीने धन लाभ होईल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. स्वत:साठी वेळ काढाल. कार्यालयात सहकारी कौतुक करतील. नवा व्यवसाय करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. संवाद कौशल्य वाढवाल.
शुभरंग : निळा

सिंह (LEO – Tuesday 14, 2022)
कौटुंबिक जीवन चांगले राहिल. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. प्रिय व्यक्तिशी भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही. टीव्ही मोबाईलचा अति वापर टाळा. योग्य बचत केलीत तर यशस्वी व्हाल. प्रत्येक वस्तू आणि व्यक्तिप्रती कृतज्ञ राहा. शिक्षकांचा आदर करा.
शुभरंग : केशरी

कन्या (VIRGO – Tuesday, June 14, 2022)
विनोदबुद्धिमुळे इतरांना आकर्षित कराल. मौल्यवान वस्तू सांभाळा. घरापासून दूर राहावे लागेल. रिकामा वेळ नवीन व्यक्तिंच्या भेटी घेण्यात घालवाल. नातेवाईक अनपेक्षित घरी येण्याची शक्यता आहे. जुनी मैत्रिण अचानक भेटेल. आवडता पदार्थ खायला मिळेल. दागिन्यांची खरेदी कराल. जवळच्या व्यक्तिंना जपावे लागेल.
शुभरंग : पोपटी

तूळ (TULA- Tuesday, June 14, 2022)
विष्णुसहस्त्रनामावलीचे वाचन करा. आपल्या कार्याला घरच्यांचा पाठिंबा राहिल. सवाष्ण महिलेला गाईची मूर्ती दान करा. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्याल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक गोष्ट घडेल. व्यवसायाला नवीन दिशा मिळेल. आपल्याला मदत करण्याकरिता नातेवाईक पुढाकार घेतील.
शुभरंग : राखाडी

वृश्चिक ( SCORPIO -Tuesday, June 14, 2022)
वडाच्या झाडाला दूध अर्पण करा. धार्मिक कार्यात भाग घ्याल. मिळणाऱ्या संधीचे सोने कराल. रिकामा वेळ योग्य आणि महत्त्वाच्या कामासाठी वापराल. स्वत:तील कौशल्याचा वापर करा. अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न राहील. अनावश्यक कामात वेळ घालवू नका.
शुभरंग : पांढरा

धनु (SAGITTARIUS – Tuesday, June 14, 2022)
आजचा दिवस धावपळीचा असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कामाचा ताण घेऊ नका. प्रिय व्यक्तिच्या भेटवस्तू द्या. सकाळचा वेळ बागकामात घालवा. प्रेमीयुगुलांनी उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका.
शुभरंग : मोरपिसी

मकर ( CAPRICORN – Tuesday, June 14, 2022)
गरजू लोकांना मोहरी, मुळा आणि गहू दान करा. सायंकाळी खास योजना आखाल. सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम बघण्यासाठी वेळ घालवाल. आपल्या क्षेत्रातील जास्तीत जास्त अनुभवी लोकांची भेट घ्या. जोडीदार तुम्हाला खूश करण्यासाठी प्रयत्न करेल. कामाच्या ठिकाणी प्रेम आणि सहकार्य लाभेल. पैशाची गुंतवणूक कराल.
शुभरंग : काळा

कुंभ (AQUARIUS – Tuesday, June 14, 2022)
पोटाचे आरोग्य सांभाळा. आरामाकरिता वेळ काढा. सामाजिक कार्यात भाग घ्याल. भविष्यातील गुंतवणूक फायद्याची ठरेल. ऑफिसमधून परत येताना आपले आवडते काम करू शकाल. प्रिय व्यक्तिसोबत मनमोकळेपणे बोलायला वेळ मिळेल. नवीन उपक्रम, उद्योग सुरू कराल.
शुभरंग : हिरवा

मीन (PISCES – Tuesday, June 14, 2022)
चांगल्या लोकांशी जोडून राहा. लोकांबद्दल वाईट विचार करू नका. घरात शुभकार्य होईल. आपल्या मनसोक्त हसण्यामुळे आरोग्य चांगले राहिल. जवळच्या लोकांसोबत वेळ घालवाल. करमणुकीचे कार्यक्रम पाहाल.
शुभरंग : सोनेरी