
इलेक्ट्रीक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता बेस्ट उपक्रमाने बस थांबे व डेपोत चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बेस्ट उपक्रमाच्या 5 बस आगारात 86 चार्जिंग पॉईट्स असून आणखी 330 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बेस्टच्या ताफ्यात पर्यावरणस्नेही इलेक्ट्रीक बसेसचा समावेश होत आहे. बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रीक बसेसच्या चार्जिंगसाठी पाच ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले असून 86 पॉईट्स उपलब्ध करण्यात आले आहेत. सध्या बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या सहा इलेक्ट्रीक तर भाडेतत्त्वावरील 386 ई – बसेस आहेत. तर 2023 पर्यंत इलेक्ट्रीक बसेसचा ताफा तीन हजारांच्या घरात जाणार आहे. तर 2028 पर्यंत 70 टक्के इलेक्ट्रीक किंवा सीएनजी बसेसचा ताफ्यात समावेश असणार आहे. इलेक्ट्रीक वाहन खरेदीकडे कल वाढला आहे. त्यामुळे भविष्यात चार्जिंग स्टेशनची कमतरता भासू नये यासाठी बेस्ट उपक्रम 330 चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
या ठिकाणी चार्जिंग स्टेशन
बॅकबे बस डेपो, वरळी, धारावी काळाकिल्ला, शिवाजी नगर व मालवणी
चार्जिंग पॉईट्स कुठे व किती
बॅकबे डेपो – 25, वरळी – 12, काळाकिल्ला – 20, शिवाजी नगर – 19 व मालवणी – 19




























































