40 लाखांचे कोडेन जप्त, एनसीबीची भिवंडीत कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) भिवंडी येथे कारवाई करून 7200 बॉटल्स कोडेन सिरपचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या त्या साठय़ाची किंमत सुमारे 40 लाख रुपये आहे. याप्रकरणी एनसीबीने दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

भिवंडी येथे एका जीपमधून कोडेनच्या बाटल्या घेऊन जाणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्यानंतर एनसीबीने भिवंडी महामार्ग परिसरात सापळा रचला. बुधवारी रात्री भिवंडी महामार्गावरून जात असलेल्या संशयास्पद जीपचा एनसीबीच्या पथकाने फिल्मी स्टाइलने पाठलाग केला. एनसीबीने त्या जीपला थांबवून त्याची पाहणी केली असता जीपमध्ये कोडेनच्या 7 हजार 200 बाटल्या होत्या.

जप्त केलेले कोडेन हे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे वितरित केले जाणार होते. एनसीबीने गुह्यात वापरलेली जीप जप्त केली आहे. कोडेन तस्करीप्रकरणी दोघांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे.