
केंद्रा सरकारने नुकतीच घोषणा केल्या ‘अग्निपथ’ या योजनेवरून उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रचंड राडा सुरू आहे. सलग तिसऱ्या दिवशी उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, तेलंगाणा राज्यातील तरुण रस्त्यावर उतरले. झाकलेला चेहरा, हातात काठी, खिसाश काडेपेटी आणि सरकारविरोधात घोषणा… अशा आवेशात हजारो तरुण रस्त्यावर उतरले आणि चक्का जाम केला. अनेक ठिकाणी आजही रेल्वे गाड्यांना आग लावण्यात आली. तसेच रेल्वे स्थानकांवर तोडफोडही करण्यात आली.
गुरुवारी बिहारमध्ये आंदोलनकर्त्यांनी पाच ट्रेनला आग लावली होती. आजही बिहारमध्ये तीन ट्रेन जाळण्यात आल्या आहेत. अग्निपथ योजनेविरुद्ध तरुणांची उग्र निदर्शनेही आजही सुरू आहेत. आज समस्तीपूरमध्ये जम्मूवती-गुवाहाटी एक्सप्रेसला आग लावण्यात आली, तर लथीसरायमध्ये विक्रमशिला एक्सप्रेसला आगीच्या हवाली करण्यात आले. आरा जिल्ह्यातही कुल्हडिया येथे पॅसेंजर ट्रेन जाळण्यात आली. यासह बक्सर, बिहिया, आरा, कटिहार, बेगुसराय आणि बिहटासह अनेक जिल्ह्यात तणाव पाहायला मिळतोय.
#WATCH बिहार: प्रदर्शनकारियों ने अग्निपथ योजना के विरोध में लक्खीसराय जंक्शन पर एक ट्रेन में आग लगा दी।
पुलिस ने बताया, “4-5 डिब्बों में आग लगी है, उन लोगों ने मुझे भी वीडियो बनने से मना कर दिया और मेरा फोन छीन लिया।” pic.twitter.com/aP16fYuEb5
— ANI_HindiNews (@AHindinews) June 17, 2022
उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला
‘अगिनिपथ’ योजनेविरुद्ध रस्त्यावर उतरलेल्या जमवाने राजकीय नेत्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. गुरुवारी भाजप आमदाराच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर आज थेट उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर जमाव चाल करून गेला. जमावाने उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या बेतिया येथील घरावर हल्ला चढवला. याबाबत रेणू देवी यांच्या मुलीने एएनआयला माहिती दिली. बेतिया येथील घरावर हल्ला झाला असून आमचे खूप नुकसान झाले आहे, असे रेणू देवी यांच्या मुलीने सांगितले. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा रेणू देवी या राजधानी पाटणामध्ये असल्याचे समजते.
#WATCH बिहार: प्रदर्शनकारियों ने बेतिया में अग्निपथ योजना के विरोध में उपमुख्यमंत्री रेणु देवी के आवास पर हमला किया।
रेणु देवी के बेटे ने ANI को बताया, “बेतिया में हमारे आवास पर हमला हुआ था। हमें बहुत नुकसान हुआ। वह (रेणु देवी) पटना में हैं।” pic.twitter.com/sMMV2IKHHb
— ANI_HindiNews (@AHindinews) June 17, 2022
तेलंगाणामध्येही उद्रेक
बिहारप्रमाणे तेलंगाणामध्येही तरुणांचा उद्रेक पाहायला मिलत आहे. अग्निपथ योजनेविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनकर्त्यांनी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर राडा घातला. तरुणांनी रेल्वे स्थानकाची तोडफोड केली आणि एका रेल्वेला आगही लावली. त्यामुळे येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
तेलंगाना: प्रदर्शनकारियों ने अग्निपथ योजना के विरोध में सिकंदराबाद रेलवे स्टेशन पर तोड़फोड़ की और एक ट्रेन में आग लगा दी। #AgnipathRecruitmentScheme pic.twitter.com/9GrQPL9lPO
— ANI_HindiNews (@AHindinews) June 17, 2022
हरयाणात इंटरनेट सेवा बंद
हरयाणामध्येही जमाव रस्त्यावर उतरला असून अनेक ठिकाणी हिंसच आंदोलन सुरू आहे. गुरुवारी गुरुग्राम, रेवाडी आणि पलवलमध्ये राडा झाला. त्यानंतर शुक्रवारी बल्लभगडमध्ये तरुण जमा झाल्याने प्रशासनाने इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद केली. तसेच पलवलमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. जमावाला पांगण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला असून आतापर्यंत 15 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.




























































