
कश्मीर फाईल्स चित्रपटात कश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय व नरसंहार आणि मुस्लिमांचे मॉब लिचिंग यात काहीच फरक नाही, असे विधान करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी हिने आता सारवासारव केली आहे. माझे विधान चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आले, असे तिने म्हटले आहे.
साई पल्लवीने नुकतेच इन्स्टाग्राम लाईव्ह येत याबाबत स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकला आहे. विराट पर्वम या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने कश्मीर पंडितांचा नरसंहार आणि मुस्लिमांचे मॉब लिचिंग याबाबत विधान केले होते. त्यामुळे तिच्यावर चहूबाजूंनी टीका झाली होती.

























































