21 जूनला दिवस सवातेरा तासांचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

21 जूनला सूर्य अधिकाधिक उत्तरेस असून त्याचे दक्षिणेकडे जाणे अर्थात उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. 21 जूनला उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो व रात्र सर्वात लहान असते. मंगळवारी दिवस सवातेरा, तर रात्र पावणेअकरा तासांची असेल, अशी माहिती विश्वभारती विज्ञान केंद्राचे प्रभाकर दौंड यांनी दिली.