मोहोळमधून दोन तलवारी हस्तगत; एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील कोळेगाव येथून दोन तलवारी हस्तगत करण्यात आल्या असून, एकाला अटक करण्यात आली आहे. फिरोज अब्दुल रजाक शेख असे अटक केलेल्याचे नाव आहे.

मोहोळ पोलीस रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करीत असताना कोळेगाव येथे वर्धमान कंपनीच्या फिरोज अब्दुल रजाक शेख हा दोन तलवारी बाळगत असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने तेथे पोहोचून तपासणी केली असता, एका घरामध्ये दोन तलवारी आढळून आल्या. याप्रकरणी घरमालक शेख याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर आर्म्स ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.