
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे. 5 जुलैला दिल्ली येथील ईडीच्या कार्यालयात पांडे यांना बोलवण्यात आले आहे. एनएसई प्रकरणात समन्स पाठवल्याचे बोलले जात आहे.
संजय पांडे हे गेल्याच आठवडय़ात मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झाले आहेत. 5 जुलैला पांडे यांना सकाळी साडेअकरा वाजता ईडीच्या दिल्ली कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. एनएसई प्रकरणात चौकशीसाठी ईडीने हे समन्स पाठवल्याचे बोलले जात आहे.
































































