
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सातही तलाव क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस होत असल्याने पालिकेने लागू केलेली 10 टक्के पाणीकपात 12 दिवसांतच रद्द केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सात तलावांत मिळून सध्या 375514 दशलक्ष लिटर पाणी जमा आहे. मुंबईला दररोज होणाऱया 3850 दशलक्ष लिटर पाण्याचे प्रमाण पाहता हे पाणी पुढील 100 दिवसांना पुरणारे आहे.


























































