
मुंबईत कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यास आता सिटी डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचे 150 जवानही अग्निशमन दल आणि पालिकेच्या बचाव कार्यात सहभागी होण्यासाठी धावून येणार आहेत. ‘सीडीआरएफ’च्या मदतीमुळे बचावकार्य वेगाने होणार असून जीवित-वित्तहानी टळण्यास मदत होईल.
अग्निशमन दलाच्या सक्षमीकरणासाठी पालिकेच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले जात आहे. यामध्ये आता नॅशनल डिजास्टर रिस्पॉन फोर्सच्या धर्तीकर पालिकेने 2018मध्ये स्थापन केलेल्या ‘सीडीआरएफ’ची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 150 जवान कार्यरत आहेत. हे जवान मुंबईत घडणाऱया दुर्घटनांमध्ये सहभागी होत असतात.
या जवानांना आणखी सक्षमपणे बचावकार्यात सहभागी होण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रशिक्षण दिले जात असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. यामध्ये बेसिक प्रशिक्षण दिले असून आगीसारख्या मोठय़ा दुर्घटनेत रेस्क्यू ऑपरेशन, बचावकार्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल.




























































