
हिंदुस्थानी नौदलाकडून 13 ऑगस्टला दक्षिण मुंबईत 10 आणि 5 किलोमीटरच्या हेरीटेज रनचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील अनेक वारसा वास्तूंबद्दल जनजागृती करण्यासाठी या दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या नियोजित मार्गावर सुंदर व्हिक्टोरियन गॉथिक शैली आणि कलात्मकतेचे दर्शन घडवणाऱया अनेक इमारती असून त्यांना युनेस्कोने जागतिक वारसा वास्तू म्हणून घोषित केल्या आहेत. हेरिटेज रनची नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणी youtoocanrun.com/races/indian-navy-mumbai-heritege-run-2022/?utm येथे ऑनलाइन करू शकता.






























































