
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे थैमान सुरूच असून, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद 40 हजार 388 क्युसेकपर्यंत गेली असून, पाणीसाठय़ात चोवीस तासांत 3.87 टीएमसीने वाढ झाली आहे. महाबळेश्वरला तब्बल 246 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, पश्चिम भागातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा, कराड, वाई, पाटण, जावली तालुक्यातही दमदार पाऊस सुरू आहे. त्या तुलनेत कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा तालुके अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात कालपासून पावसाचा जोर वाढला असून, काल रात्रभर व आज दिवसभर संततधार सुरू असल्याने कोयनेसह तारळी, उरमोडी, कण्हेर, धोम आदी प्रमुख धरणांच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होत आहे. त्याचप्रमाणे कृष्णा, कोयना, वेण्णा, तारळी, कुडाळी, उरमोडी, उत्तर मांड आदी नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. पावसाचा जोर असला तरी अद्याप धरणांमधील पाणीसाठा 50 टक्क्यांच्या खालीच असल्याने तूर्त पुराचा धोका नाही. मात्र, डोंगरदऱयात दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे.
कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मंगळवारी पावसाचा जोर वाढला आहे. संततधार पाकसामुळे धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 40 हजार 388 क्युसेक पाण्याची आकक होत आहे. धरणात सध्या एकूण 36.37 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून, त्यापैकी उपयुक्त साठा 31.37 टीएमसी इतका आहे. धरण 34.55 टक्के भरले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 49 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यात सलग तिसऱया दिकशीही काहीशी उसंत घेत, संततधार पावसाची रिपरिप सुरूच राहिली. त्यामुळे पंचगंगेच्या पातळीत फुटाने वाढ झाली, तर दुपारपर्यंत 49 बंधारे पाण्याखाली गेले होते. दरम्यान, धरणक्षेत्रातील पाऊस आणि विसर्गामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, मध्यरात्री 12 च्या सुमारास 33 फूट असलेली पाणीपातळी सायंकाळी 4च्या सुमारास 34.2 फुटांकर आली होती. संभाक्य पुराच्या शक्यतेमुळे पूर येणाऱया भागातील नागरिकांनी घरातील साहित्याची आकराआकर करून सुरक्षितस्थळी नातेकाईकांच्या घरी जाणे सुरू केले आहे, तर प्रयाग चिखली ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना स्थलांतराचे आवाहन करण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवडय़ापासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे बहुतांश सर्वच धरण प्रकल्प अर्ध्याहून अधिक भरले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीतही तब्बल 25 फुटांहून अधिक काढ झाली आहे. पंचगंगेसह सर्व नद्या इशारा पातळीपासून अवघ्या चार ते पाच फूट दूर आहेत.




























































