
जगावर आलेल्या कोविड संकटाचे धक्के अजूनही बसत आहेत. सैन्यानंतर 24 सतत कार्यरत असलेल्या रेल्वेलादेखील याचा फटका बसला आहे. कोरोना साथीच्या काळात रुग्णांच्या उपचाराकरिता खास बनविलेले कोविड बेड आणि लीननचा केलेला वापर तसेच मजुरांच्या स्थलांतरामुळे कंत्राटी तत्त्वावर सुरू केलेल्या खासगी टनेल लॉण्ड्री ठप्प झाल्याने मेल-एक्स्प्रेसमध्ये चादरी व उशा पुरविणे रेल्वे प्रशासनाने बंद केल्याचे उघडकीस आले आहे. ऑगस्टमध्ये मध्य रेल्वेच्या सर्व मेल-एक्स्प्रेसमध्ये लीनन सेवा पूर्ववत होणार आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली.
सध्या 93 पैकी 47 मध्ये बेडरोल
सध्या दररोज लागणारे बेडशिट – 55,000
कोरोनाआधी रोज लागणारे बेडशिट -1,04,000
























































