
मुसळधार पावसामुळे अचानक ट्रेन रद्द झाली आणि रेल्वे प्रशासन या विद्यार्थी प्रवाशाच्या मदतीसाठी धावली. विद्यार्थ्याला कॅब बुक करून इच्छित स्थळी पाठवले. या विद्यार्थ्याने नुकताच एक भारतीय रेल्वेचे आभार मानण्यासाठी व्हिडिओ संदेश शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून रेल्वे प्रशासनाचे कौतुक होत आहे. डीआरएमने हा व्हिडीओ ट्विट केला आहे.
सत्यम गढवी असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो आयआयटी मद्रास एरोस्पेस अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहे. त्याला कॉलेजमध्ये जायचे होते. त्याने एकता नगर रेल्वे स्थानक ते वडोदरा स्थानकापर्यंत जाणारी ट्रेन बुक केली होती. मात्र मुसळधार पावसामुळे ही ट्रेन रद्द करण्यात आली. भारतीय रेल्वेने या प्रकरणाची दखल घेत सत्यमसाठी एकता नगर ते वडोदरा अशी कॅब बुक केली जेणेकरून तो तिथून चेन्नईला जाऊ शकेल. या व्हिडीओत सत्यम सांगतोय की, पावसामुळे ट्रॅकवर पाणी आल्याने त्यांची एकता नगर ते वडोदरा ही ट्रेन रद्द करण्यात आली होती.
व्हिडीओमध्ये सत्यम सांगतोय की, आज, माझा प्रवास सुखरुप आणि यशस्वी करण्यासाठी एकता नगर ते वडोदराच्या सर्व रेल्वे विभागाचा मी आभारी आहे. मी जी ट्रेन बुक केली होती. ती एकतानगर येथून 9.15 ला सुटणार होती. मात्र पावसामुळे ट्रॅकवर पाणी आलं आणि शेवटच्या क्षणाला ट्रेन रद्द करण्यात आली. मात्र एकता नगरच्या काही रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने मी इच्छित स्थळी पोहोचलो. त्यांनी माझ्यासाठी एक कार भाड्यावर घेतली. त्यांनी दाखवून दिले की प्रत्येक रेल्वे प्रवाशाला ते किती महत्व देतात. तसेच त्यांनी कार करून दिलेला चालक एक चांगली व्यक्ती आहे. त्यांनी व़डोदराहून ट्रेन पकडून देण्यात मदत केली.
पश्चिम रेलवे के चाँदोद – एकता नगर रेल खंड के क्षतिग्रस्त होने के कारण रेल यातायात बंद होने से 20920 एकतानगर- एमजीआर चेन्नई सेंट्रल के एकता नगर – वडोदरा के बीच निरस्त होने के कारण इस ट्रेन के एकतानगर से एकमात्र यात्री को कार से वडोदरा पहुँचाया गया @WesternRly @RailMinIndia pic.twitter.com/6kzLaxCYwu
— DRM Vadodara (@DRMBRCWR) July 13, 2022






















































