
बांगलादेशातील लोहागरा भागात शुक्रवारी संध्याकाळी संतप्त कट्टरतावादी जमावाने हिंदू वस्ती आणि एका मंदिरावर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात घरांची नासधूस झाली. हल्लेखोरांना रोखण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला, मात्र एकाही हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली नाही.
सहपारा भागात राहणाऱ्या आकाश साहा याने फेसबुकवर मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात पोस्ट केली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी हा हल्ला करण्यात आला, असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, पोस्ट करणाऱ्या आकाश साहा याचे पिता अशोक साहा यांनाही पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याबद्दल अटक केली आहे, असे पोलीस निरीक्षक हरनचंद्र पॉल यांनी सांगितले.


























































