मूल दत्तक घ्यायचंय… 28 हजार जोडप्यांना आई-बाबा बनण्याची ओढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील हजारो जोडप्यांना आई-बाबा बनण्याची ओढ लागली असून तब्बल 28 हजार 663 अर्जदार मूल दत्तक घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. मूल दत्तक घेणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचेही मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले, अनिवासी हिंदुस्थानी आणि हिंदुस्थानी परदेशी नागरिकांसह 1 हजार 30 अर्जदारांनी मूल दत्तक घेण्यासाठी पेंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाकडे (सीएआरए) नोंदणी केली आहे.

2021-22 मध्ये देशांतर्गत 2 हजार 991 दत्तक मुलांची नोंद झाली होती, तर दोन देशांतर्गत 414 मुलांना दत्तक घेण्यात आले होते, असे स्मृती इराणी यांनी सांगितले.