
>> मलिका अमरशेख
संकटातून सुटका करणारी एक शक्ती निर्माण करणं हे पूर्वीच्या माणसांना अपरिहार्य वाटत असावं. फक्त तुकाराम बुवाच वेगळे. ‘बरे झाले देवा निघाले दिवाळे’ असं फक्त तेच म्हणू शकले. तुकारामासारखं संसारात राहून संसार असार मानणारेही तेच. तर पती निधनानंतरही ‘संसार खोटा म्हणू नये’ हे सांगणारी बहिणाबाईही धन्यच. दोघंही कवी. दोघंही मातीशी, मनाशी, जगाशी जगण्याशी इमान राखून शब्दलेणी रचणारे. बाकीचे फक्त वारकरी.
‘अरे संसार संसार
खोटा कधी म्हणू नये
राऊळाचे कळसाले
लोटा कधी म्हणू नये’
असं बहिणाबाई सांगून गेल्या, तर काही म्हणतात, ‘संसार असार आहे. म्हणजे जगात दोनच गट – एक आहे रे आणि नाही रे! एक म्हणतो संसारच सत्य तर दुसरा म्हणतो, संसार माया-मिथ्या. नेमपं सत्य काय? की जशी प्रत्येक डोक्याला वेगळी पगडी तशी सत्य पण वेगळी, मिथ्यापण वेगळंच. तसं पाहिलं तर संसार मिथ्या असं म्हणणारे पण संसारच करतात. फक्त तो वेगळा असतो. घराच्या ऐवजी देऊळ, भांडय़ांऐवजी कमंडलू, भगवी वस्त्र्ाs, खडावा, पत्नीऐवजी त्याच्या मनोमंदिरात देवाची प्रतिमा. काही जण तर संसार मोहमाया म्हणणारे हातात मनगटी घडय़ाळ, पैसे झालंच तर चिलीमबिलिम.
तर संसार करणाऱयांची वेगळीच तऱहा… सासू तीर्थयात्रेला निघतेय… सुनेच्या हाती घराचा ताबा देताना ती कचरतेय… न शेवटी तांब्या, घंघाळ, टाकी हेच माझं पंढरपूर, असं म्हणून ती संसारच सत्य म्हणून थांबते.
‘उखळ मुसळ जाते
माझे मन गुंतुले तेथे’
तर काही मध्यममार्गी संसारातल्या कर्तव्य जबाबदाऱया पार पडता पडता तो न चुकता परमार्थही करतो. आमचे एक पुणेकरी मित्र अचानकपणे रस्त्यातल्या मंदिरासमोर अचानक चपला काढून हात जोडते झाले. विस्मयानं पाहून ‘हे काय?’ विचारल्यावर म्हणाले, ‘नाही तसा मी मानतच नाही, पण असला तर काय घ्या!’ तर काही निसर्गालाच देव मानणारे, तर काही लहान मुलात देव पाहणारे, तर काही ‘देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर’ असा खणखणीत निर्वाळा देतात, पण तरीही लाखो वारकरी पायी चालत यात्रा करतातच. ज्याचा त्याचा पांडुरंग वेगळा असतो एवढंच.
तसं पाहिलं तर त्यांचं जगणं सोपं. कारण प्रत्येक संकटाच्या वेळी, ‘तू बघ रे बाबा’, ‘आता तूच निवारण कर’ असं म्हणून देवाच्या गळय़ात हार टाकावा तसं आपली संकटं त्याच्या गळय़ात टाकून मोकळे. काही झाले तर ‘काय करणार?’ आले देवाजीच्या मना तिथं कुणाचे चाले असंही म्हणणार. पुन्हा अख्ख्या जगभरात प्रत्येक पंथाचा देव आहे. संकटाचं, अपयशाचं खापर पह्डायला दोनच संस्था जगात आहेत. एक देव, दुसरं सरकार. पूर्वी तिसरी पण संस्था होती – आई-बाप! पण आता ती संस्था बरखास्त केलीय पोरांनी. आता त्यांचे ते निर्णय घेतात. पूर्वी आई-बाप आणि त्याबरोबर अतिथी पण देव होते. आता नाहीत. आताची मुलं आई-बाप लवकरात लवकर देवाच्या भेटीला नाही गेले तर वृद्धाश्रमात पाठवतात. अतिथी आलाच तर एक दिवसाचा पाहुणा दुसऱया दिवशी ओझं, तिसऱया दिवशी संकट, चौथ्या दिवशी लिलाव!
हिंदुस्थानात ‘पती हाच परमेश्वर’ असं मानणाऱया अफाट सहनशक्ती असणाऱया ‘शक्ती’ आहेत, तर काही ‘पती हाच एटीएम मशीन’ पिंवा ‘पती ही आपत्ती’ मानणाऱया आहेतच.
म्हटलं ना की, प्रत्येकाचं सत्य वेगळं. आता असं पाहा – खोटं बोलणं पाप आहे असं आपला यच्चावत समाज मानतो, पण कधी खोटं बोलावं, कधी नाही याचे पण काही निकष आहेतच आणि अगदी आश्चर्यकारकपणे न शिकवता, न सांगता ते सगळय़ांनाच माहीत असतात. शिवाय पुराणात ‘हरिश्चंद्राची’ कथा तर वचन पाळलं तर किती संकटं येतात भयानक हे पाहूनच हे सत्य कळतं की वचन देऊच नये, दिलं तरी पाळलंच पाहिजे असं नाहीय.
आपल्या पुराणातल्या कथा ऐकल्या की, आपण कलियुगात जन्मलो हे बरंच झालं, असेही मानायला जागा आहे. ऊठसूठ शाप देणारे ऋषीमुनी, पुन्हा सत्वपरीक्षा, अगदी देवांना पण सुटका नव्हती.
आता हे एक मजेदार की माणसानं, लेखकानं चक्क देवालाही पृथ्वीवर अवतार घ्यायला भाग पाडलंय. नाहीतर मस्तपैकी अमृत पीत अप्सरांचा नाच बघायचं सोडून इथं भवसागरात भक्तांचं संकट निवारण करणं, दळण दळून देणं वगैरे काम करायला देवाला लावणं म्हणजे शिक्षाच.
संकटातून सुटका करणारी एक शक्ती निर्माण करणं हे पूर्वीच्या माणसांना अपरिहार्य वाटत असावं. फक्त तुकाराम बुवाच वेगळे. ‘बरे झाले देवा निघाले दिवाळे’ असं फक्त तेच म्हणू शकले. तुकारामासारखं संसारात राहून संसार असार मानणारेही तेच.
तर पती निधनानंतरही ‘संसार खोटा म्हणू नये’ हे सांगणारी बहिणाबाईही धन्यच.
दोघंही कवी. दोघंही मातीशी, मनाशी, जगाशी जगण्याशी इमान राखून शब्दलेणी रचणारे. बाकीचे फक्त वारकरी.



























































