
आयुष्याच्या चढउतारात मन हलकं करायला मैत्रीचे नाते हवे असते. आपल्या मनातल्या मैत्रीच्या या कोपऱयाचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे व्यक्त करून सांगणे गरजेचे असते. हाच आशय ‘रूप नगर के चीते’ या आगामी मराठी चित्रपटात आहे.
‘रूप नगर के चीते’ या चित्रपटाचे आकर्षक पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून 16 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एकमेकांच्या खांद्यावर आत्मविश्वासाने हात टाकून, आपल्याच मस्तीत चाललेले दोन तरुण मित्र या पोस्टरमध्ये दिसत आहेत. चित्रपटाच्या निमित्ताने करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा अभिनेते मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.




























































