शिमला – बस दरीत कोसळून अपघात, एक ठार तर 20 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत.

हा अपघात हीरा नगर परिसरात झाला आहे. बुधवारी दुपारी हिमाचल राज्य सरकारची बस नगरोटाहून सिमला येथे जात होती. या बसमधून 20 ते 23 जण प्रवास करत होते. वाटेत हीरा नगर परिसरात घाटातून जाताना बस रस्त्यावरून खाली 100 फूट दरीत कोसळली.

या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित 20 जखमी झाले आहेत. जखमींना त्वरित सिमला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर इलाज सुरू आहे.