ड्रीम जॉबसाठी काय पण… 40 वेळा अर्ज केल्यानंतर लागली नोकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखाद्या बडय़ा पंपनीत  नोकरी मिळावी, हे अनेकांचे स्वप्न असते. काहींना अगदी पहिल्या- दुसऱया प्रयत्नात तर काहींना त्याहून अधिक प्रयत्नांमध्ये ड्रीम जॉब मिळतो, पण ड्रीम जॉबसाठी  तब्बल 40 वेळा प्रयत्न केल्याचे तुम्ही ऐकलंय का? होय, एका व्यक्तीने गुगल या अमेरिकन पंपनीमध्ये ड्रीम जॉब मिळवण्यासाठी 39 वेळा अर्ज केले, पण त्याला यश आलं नाही. अखेर 40 व्या वेळी अर्ज केल्यावर त्याला नोकरी मिळाली. 

 टायलर कोहेन असे या जिद्दी व्यक्तीचे नाव असून त्याला गुगलकडून 39 वेळा नोकरीसाठी नकार मिळाला होता. मात्र तरीही कोहेचा आत्मविश्वास बघा. त्याने पुन्हा एकदा अर्ज केला आणि त्याचे नशीब चमकले. गुगलने त्याला असोसिएट मॅनेजरची नोकरी दिली. टायलर कोहेन याने लिंक्डइनवर ही स्टोरी पोस्ट केली आहे. ही पोस्ट आता व्हायरल झाली आहे.