पुणे – विनापरवाना पिस्तूल बाळगणारा अटकेत; तीन पिस्तुल जप्त, युनिट सहाची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीला युनिट सहाने येरवडा परिसरातून अटक केली. त्याच्याकडून तीन पिस्तूल जप्त करण्यात आले. राहुल रोहिदास जाधव (वय 31 रा. लक्ष्मीनगर, येरवडा )असे अटक केलेल्याचे नाव आहे.

येरवडा परिसरातून हिंदू स्मशानभूमीजवळ एकजण पिस्तूल बाळगून थांबल्याची माहिती युनिट सहाला मिळाली. त्यानुसार पथकाने राहुल जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूलासह काडतुस जप्त केले. अधिक चौकशीत आणखी दोन पिस्तूल आणि दोन काडतुस जप्त करण्यात आली.

ही कामगिरी उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश टिळेकर, सचिन पवार, शेखर काटे, नितिन धाडगे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे , सुहास तांबेकर यांनी केली.