एक रुपयांत पाच प्रवासाची ‘बेस्ट आजादी’ योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best-bus

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व बेस्टच्या महापालिकाकरणाचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून बेस्टची नव्याने बेस्ट चलो मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करणार्‍या ग्राहकांसाठी  एक रुपयांत पाच प्रवासाची ‘बेस्ट आजादी’ योजना लागू करण्यात येणार असून ती 15 ऑगस्टपर्यंत वैध राहणार आहे.

या योजनेअंतर्गत चलो अ‍ॅपचा पहिल्यांदा वापर करणार्‍या नव्या प्रवाशांना सात दिवसांचा बसपास केवळ एक रुपयांत डाउनलोड करता येईल. ज्यामध्ये त्यांना वातानुकूलित किंवा विना वातानुकूलित बसमध्ये सात दिवसांत कितीही अंतराच्या पाच फेर्‍यांचा लाभ घेता येईल. ही सवलत दिनांक 15 ऑगस्ट 2022 पर्यंत लागू राहील असे बेस्टने म्हटले आहे.