हडपसरमध्ये इमारतीवरून पडल्याने तरूण मजूर ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडल्याने तरूण मजूराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कामगारांच्या सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा बाळगल्याप्रकरणी मार्बल आर्को सोसायटीच्या मॅनेजर आणि ठेकेदाराविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 जूनला हडपसरमधील मार्बल आर्को सोसायटीत घडली. दत्तात्रय बाजीराव उमाप (वय 35 रा. वैदवाडी, हडपसर) असे ठार झालेल्या मजूराचे नाव आहे. रेखा उमाप (वय 30) यांनी तक्रार दिली आहे.

हडपसर परिससरात मार्बल आर्को सोसायटीचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी दत्तात्रय मजूरीला असताना दुसऱ्या मजल्यावर काम करीत होता. त्यावेळी संबंधित सोसायटी मॅनेजरसह ठेकेदाराने कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही सुरक्षासाधने पोहोचवली नाहीत. त्यामुळे पाय घसरून पडल्यामुळे दत्तात्रय यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी तपास करीत आहेत