
एसटी महामंडळाने कोकणात गणेशोत्सवासाठी दोन हजारांहून अधिक जादा गाडय़ा सोडल्या आहेत. त्यापैकी 856 बस फुल झाल्या असून 700 बसेसचे अंशतः आरक्षण झाले असून तर ग्रुप बुपिंगच्या 1201 बसेस आरक्षण फुल झाले असून एकूण 2,757 बसेसचे आरक्षण फुल झाले आहे. येताना 135 बसेसचे आरक्षण फुल झाले असून 572 बसेसचे अंशतः आरक्षण झाले असून ग्रुप बुपिंगच्या 66 बसेस असे एकूण परतीच्या प्रवासाचे 773 बसेसचे आरक्षण फुल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
10 ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार चाकरमान्यांनी ग्रुप बुपिंगला सर्वाधिक पसंती दिली असून मुंबई विभागातून 647, पालघर – 303, ठाणे-249, रायगड-2 अशा प्रकारे मुंबई प्रदेशातून 1201 बसेसचे ग्रुप बुपिंग पूर्ण झाले असल्याचे उप जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी सांगितले. तर मुंबई विभाग-237, पालघर – 97, ठाणे-268, रायगड-24, रत्नागिरी-173, सिंधुदुर्ग-37, मुंबई प्रदेश-836, पुणे-20 अशा 856 बसेस आरक्षण फुल झाले आहे, तर 700 बसेसचे आरक्षण अंशतः पूर्ण झाले असून एकूण 2,757 इतक्या बसेसचे आरक्षण पूर्ण झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विभाग ग्रुपआरक्षण फुल अंशतः एकूण
मुंबई 647 237 81 965
पालघर 603 97 33 433
ठाणे 249 268 163 680
रायगड 2 24 3 29




























































