
‘दगडी चाळ’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘दगडी चाळ 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टरचे अनावरण अरुण गवळी ऊर्फ डॅडींच्या हस्ते दगडी चाळीत झाले.
‘दगडी चाळ 2’ मध्ये आपल्याला सूर्या आणि डॅडी यांच्यातील एक वेगळे नाते पाहायला मिळणार आहे. एकेकाळी डॅडींचा उजवा हात असणारा सूर्या आता त्याच्या कुटुंबासोबत गँगवॉरच्या विळख्यातून बाहेर पडून एक साधं सोप्पं आयुष्य जगताना दिसत आहे. मात्र डॅडी आणि सूर्या यांच्यात असे काही घडले आहे, ज्याने सूर्या डॅडींचा तिरस्कार करू लागला आहे. आता त्यांच्यात नेमके काय घडले आहे, त्यांच्या नात्यात कडवटपणा का आला आहे हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले आहे. येत्या 19 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.


























































