साय-फाय – ‘5 जी’इंटरनेटच्या दिशेने…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

‘4 जी’ इंटरनेटच्या आगमनापासून चर्चा सुरू असलेले आणि ‘जग बदलून टाकणारे भविष्यातील तंत्रज्ञान’ अशी ख्याती पसरलेले ‘5 जी’ इंटरनेट तंत्रज्ञान लवकरच देशात सुरू होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. हिंदुस्थान सरकारने या 5 जी नेटवर्कसाठी आवश्यक असलेल्या स्पेक्ट्रमचा लिलाव नुकताच पूर्ण केला. अनेक दिग्गज मोबाइल कंपन्यांनी त्यात आपला सहभाग नोंदवला. अदानी समूहासारख्या मोठय़ा समूहानेदेखील या लिलाव प्रक्रियेत भाग घेतला; मात्र 5 जी तंत्रज्ञानाचा वापर ते टेलिकॉम व्यवसायात उतरण्यासाठी करणार नसून, स्वतःच्या व्यवसायात अधिक सुधारणा करण्यासाठी, तो वेगवान करण्यासाठी करणार आहेत. यावरून या तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि उपयोगिता लक्षात येईल.

5 जी तंत्रज्ञानाने तुम्हा आम्हा सामान्य लोकांचा काय फायदा आहे? हा सध्या आपल्या सर्वांना पडलेला प्रश्न आहे. नव्या 5 जी तंत्रज्ञानाने इंटरनेटचा वेग वाढणार आहे का? तर हो, तो नक्की वाढणार आहे. या विषयातले तज्ञ सांगतात की, 3 जी आणि 4 जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेट सामान्य माणसाच्या आवाक्यात येण्यास मदत झाली. या नेटवर्कचा स्पीडदेखील चांगला आहे. मात्र 4 जी नेटवर्क हे तांत्रिकदृष्टय़ा 3.8 जी पर्यंतच पोहोचते असे तज्ञ सांगतात. त्यामुळे येणाऱया 5 जी नेटवर्ककडून अनेक अपेक्षा आहेत. 5 जीचा स्पीड हा सध्याचा 4 जीपेक्षा 10 पट जास्त वेगवान असेल असा अंदाज आहे.

3 जी आणि 4 जी नेटवर्कच्या आगमनानंतर डेटा रेटमध्ये प्रचंड सुधारणा झाली. ऑपरेटर पंपन्यांचा खर्चदेखील कमी झाला आणि त्यामुळे सेवांचे दरदेखील सामान्यांच्या आवाक्यात आले. या ऑपरेटर्सनी मग इतर सेवादेखील ग्राहकांना पुरवायला सुरू केले. 5 जी आल्यानंतर यामध्ये अधिक सुधारणा होण्याची आशा आहे. विशेषतः गुगल मॅप्स व इतर मॅपिंग सेवांमध्ये कमाल सुधारणा होईल. 5 जी ही नावाप्रमाणेच मोबाइल नेटवर्कची पुढची पिढी आहे; मात्र आपल्या देशातील सामान्य जनता ज्या एका मूलभूत समस्येने ग्रासलेली आहे; ‘कॉल सतत ड्रॉप होणे’ त्या समस्येतून 5 जी मुक्ती देणार का? तज्ञांकडे याबद्दल चौकशी केली असता, त्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. ‘सध्या तरी यावर काही अंदाज बांधणे चूक असेल,’ असे त्यांचे मत आहे. जगातील इतर देशांमध्ये देखील 5 जी नेटवर्क दाखल होत आहे. तिथल्या पायाभूत सुविधा पूर्णपणे वेगळ्या असल्याचे समोर येत आहे. 5 जीसाठी 4 जी (LTE), 3 जीपेक्षा उच्च बँडविड्थ, वेगळे रेडिओ तंत्रज्ञान आणि वेगळ्या नेटवर्कची आवश्यकता भासणार आहे.

या नव्या नेटवर्कसंदर्भात बोलताना या क्षेत्रातील तज्ञ आणि अनेक व्यावसायिक या नेटवर्ककडे फक्त स्पीड अर्थात वेगवान इंटरनेट म्हणून पाहू नका असे आवर्जून सांगत आहेत. नव्या 5 जी तंत्रज्ञानाने तुमच्या अपलोड, डाऊनलोड सेवा पहिल्यापेक्षा अधिक वेगवान होणार असल्या तरी, 5 जी तंत्रज्ञानाचा खरा उपयोग हा ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’साठी होणार आहे. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ म्हणजे नक्की काय? तर सध्या आपण संगणक, मोबाइल यावरती इंटरनेटचा आस्वाद घेत आहोत. मात्र नव्या 5 जी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण घरातील एसी, टीव्ही, मायक्रोव्हेव ओव्हन, वॉशिंग मशीन, फ्रीज अशा अनेक गोष्टी इंटरनेटला कनेक्ट करू शकणार आहोत आणि इंटरनेटच्या मदतीने त्या ऑपरेटदेखील करू शकणार आहोत. सध्या आपण ‘स्मार्ट बल्ब’ची सेवा 4 जीवरती देखील किती सहजपणे वापरू शकत आहोत हे तर तुम्ही जाणताच. ज्या पद्धतीने सध्या आपण मोबाइलच्या मदतीने ‘स्मार्ट बल्ब’ इंटरनेटला कनेक्ट करून, तो मोबाइलच्या मदतीने चालू अथवा बंद करू शकतो, त्याच्या प्रकाशाची तीव्रता कमी-जास्त करू शकतो, रंग बदलू शकतो; तसेच इतर उपकरणांच्या सेवादेखील मोबाइलच्या मदतीने वापरणे सहजशक्य होणार आहे.

तर असे हे जणू ‘अल्लादीनचा जादूचा दिवा’ असल्यागत काwतुक होत असलेले तंत्रज्ञान लवकरच आपल्या भेटीला येत आहे. या तंत्रज्ञानाने सध्याच्या मोबाइल खर्चात काही कमतरता होईल, अशी शक्यता नसली, तरी काही काळ गेल्यावर मग याचे खरे फायदे आणि तोटे आपल्या लक्षात येऊ लागणार आहेत.

– [email protected]