
भाजपची मातृक संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या सोशल मीडियावरील डीपी बदलला आहे. तेथे आता भगव्या झेंडय़ाऐवजी तिरंगा फडकला आहे.
ज्यांनी 52 वर्षे तिरंगा फडकवला नव्हता ते कधी तिरंगा फडकवणार, असा सवाल काँग्रेससह काही विरोधकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डीपी बदलणार का, याबद्दल उत्सुकता लागून राहिली होती.
आज संघाच्या अधिकृत हॅण्डलबरोबरच सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आपल्या अकाऊंटचा डीपी बदलल्याचे पाहायला मिळाले. संघाचे प्रसिद्धी विभागाचे सहसंचालक नरेंद्र ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.



























































