दोन लाख भाविकांनी घेतले श्री शनैश्वरांचे दर्शन तिसऱया श्रावणी शनिवारनिमित्त भाविकांच्या रांगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिसरा श्रावणी शनिवार असल्याने दोन लाखांहून अधिक भाविकांनी श्री शनैश्वराचे दर्शन घेतले. महाद्वार ते शनिमूर्तीच्या चौथऱयापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. काही भाविकांनी पेड दर्शनाची पावती घेऊन चौथऱयावर जाऊन शनिमूर्तीला तेलाभिषेक केला. दरम्यान, भाविकांच्या गर्दीमुळे महाद्वार रस्ता, पोलीस ठाणे परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

गेल्या 15 दिवसांपासून श्रावण मास पर्व सुरू आहे. श्रावण महिना पवित्र मानला जातो. त्यामुळे शनिमहाराजांच्या दरबारात पूजा-अर्चा, विधिवत आभिषेक करून साडेसाती दूर करण्यासाठी हजारो भाविक शनिच्या दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. स्थानिक भाविकांबरोबरच दूरदूरचे भाविक शनिला जलाभिषेक स्नान घालण्यासाठी पायी प्रवास करतात. यावर्षी बाहेरगावचे भाविक मुक्कामी दाखल झाले. भाविकांच्या गर्दीने सर्व रस्ते फुलून गेले होते. वाहनतळे हाऊसफुल्ल झाल्याने मंदिर परिसरात वाहनांची मोठी गर्दी झाली होती.