हवामान बदलावर उद्या विज्ञान दर्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने विज्ञान दर्पण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हिंदुस्थानातील हवामान बदल या विषयावर हवामान विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. रंजन केळकर तर महाराष्ट्रातील हवामान बदलावर हवामान विभाग, पुणे येथील डॉ. कृष्णानंद होसाळीकर बोलणार आहेत. यावेळी वैद्यकीय पुस्तक पारितोषिके आणि प्रा. श्रीधर गोडबोले पारितोषिकांचे वितरण होणार आहे. 21 ऑगस्टला चुनाभट्टी येथील परिषदेच्या कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.