साय-फाय – समुद्री कासवांची आर्त हाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

आपल्या पृथ्वीवर मानवासह विविध जीवांच्या प्रजाती नांदत आहेत. या प्रजातींपैकी अनेकांचा तर अजून अभ्यासदेखील मानवाला झालेला नाही. विचार करा, या प्रजातींपैकी एखाद्या प्रजातीमध्ये फक्त मादी जीव जन्माला यायला लागले तर काय होईल? हळूहळू नरांचे अस्तित्व संपत जाईल आणि एक वेळ अशी येईल की, ही संपूर्ण प्रजाती नष्ट होण्याचे संकट उभे ठाकेल. नर आणि मादी हे प्राकृतिकदृष्टय़ा एकमेकांसाठी बनलेले असतात. ते आपली प्रजाती पुढे नेण्याचे, वाढवण्याचे कार्य करीत असतात. अशा वेळी अचानक नरांचा जन्मदर घटत जाणे ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. समुद्री कासवाच्या प्रजातीबद्दल सध्या हे विचित्र घडत आहे. त्यामुळे जगभरातील जीवशास्त्र्ाज्ञ व पर्यावरण तज्ञ चिंतेत आहेत.

फ्लोरिडामध्ये कासवांच्या उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या एका हॉस्पिटलमधील शास्त्र्ाज्ञांनी ही गोष्ट जगापुढे आणली आहे. गेल्या चार वर्षांत त्या परिसरात फक्त मादी कासवांचा जन्म होत आहे. या गोष्टीमुळे सारे आश्चर्यचकित झाले आहेत. हे असेच चालू राहिल्यास ही प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. हवामानातील बदल आणि वाढते तापमान ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे शास्त्र्ाज्ञांनी केलेल्या अभ्यासात पुढे आले आहे. जलवायू परिवर्तनाच्या या धोक्यामुळे कासवांच्या अंडय़ांमध्ये लिंगबदल होत असल्याची भीती शास्त्र्ाज्ञांना वाटते आहे.

समुद्री कासवांच्या प्रजातीमध्ये मुळातच नर कासवांची संख्या ही अत्यंत नगण्य असते. दहा समुद्री कासवे जन्म घेतात, त्यावेळी त्यापैकी एक हे नर कासव असते. यावरून नरांची उपलब्धता किती कमी आहे, हे लक्षात येते. उष्णतेचा प्रकोप असाच वाढत राहिला, तर ज्या रेतीत मादी आपली अंडी घालतात, तिचे तापमान प्रचंड वाढून अंडय़ांमध्ये लिंगबदल होत राहण्याचा धोका आहे. त्यामुळे नर कासवांचे अस्तित्व संपुष्टात येईल, त्यांची वाढ पूर्ण थांबेल. अशावेळी नर कासवाच्या शिवाय मादी कासव आपली प्रजाती पुढे नेणार कशी? मादी कासवांचे आणि पुढच्या पिढीचे अस्तित्वदेखील यामुळे धोक्यात आले आहे.

शास्त्र्ाज्ञांच्या मते समुद्री कासवाच्या एकूण सात प्रजाती आहेत. तापमानात नेहमीपेक्षा थोडी जरी वाढ झाली, तरी त्यांच्यात मादी कासवांच्या जन्माचे प्रमाण हे वाढत गेलेले दिसते. फक्त कासवच नाही, तर इतर अनेक समुद्री जीवांना हवामान बदलाचा फटका बसत असल्याचे अभ्यासातून समोर येत आहे. US National Oceanic and Atmospheric Administration (NOAA) नुसार, जेव्हा समुद्री कासवाची अंडी 310 सेल्सिअस अंडी किंवा त्याहून अधिक उबदार असलेल्या वाळूमध्ये जन्माला आली, तर मादी कासवाचे जन्म घेणे हे निश्चित असते.

फ्लोरिडामध्ये असलेल्या ‘मॅरेथॉन सिटी’ येथील ‘टर्टल हॉस्पिटल’चे व्यवस्थापक ‘बीट जकाaलबॅश’ यांच्या मतानुसार गेल्या चारही उन्हाळी ऋतूंमध्ये तापमानात सतत वाढच होत आली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे गेल्या चार वर्षांपासून आमच्याकडे फक्त मादी समुद्री कासवेच मिळत आहेत. हे फक्त फ्लोरिडा व परिसरामध्ये घडते आहे असे नाही, तर सध्या संपूर्ण जगभर हे चित्र पाहायला मिळत आहे. 2018 साली याचसंदर्भात करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे समोर आले होते की, पूर्व ऑस्ट्रेलियातील 99 टक्के कासवे ही फक्त मादी कासव आहेत.

‘वाढत्या तापमानामुळे कासवांच्या अंडय़ात लिंगबदल होत आहे’ या सिद्धांताशी प्रत्येकजण सहमत आहे असे मात्र नाही. मात्र या संपूर्ण धोक्याचा विचार करता, समुद्री कासवांमध्ये लैंगिक संतुलन निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्यावर मात्र सर्वच शास्त्र्ाज्ञांचे एकमत दिसते. काही शास्त्र्ाज्ञांच्या मते सध्या जवळपास उपलब्ध असलेल्या सर्व समुद्री कासवांमध्ये 90ज्ञ् या माद्या आहेत, अशावेळी ही प्रजाती वाढण्यासाठी, टिकण्यासाठी फक्त काही मोजक्या नरांची आवश्यकता भासणार आहे. मात्र हे नर उपलब्ध तर असायला हवेत. आणि जर ते उपलब्ध ठेवायचे असतील तर अथक प्रयत्नांची गरज भासणार आहे. समुद्री कासवाच्या प्रजातीसाठी निर्माण झालेला हा धोका सर्व सजीवांसाठी आणि निसर्गासाठी देखील एक धोक्याची घंटा आहे हे निश्चित!

– [email protected]