
महिला सक्षमीकरणासाठी पालिकेने पुढचे पाऊल उचलताना आता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पे अॅण्ड पार्क’चे काम देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेचे पार्पिंग चालवण्यासाठी मुंबईभरातील महिला बचत गटांकडून निविदा मागवल्या आहेत.
महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनवण्यासाठी ‘ए’ वॉर्डातील मर्झबान रोडवरील व डी वॉर्डातील सोफिया महाविद्यालय येथील असलेले पे अॅण्ड पार्कचे पंत्राट महिला बचत गटांना देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी 56 लाख 18 हजार 976 रुपयांच्या निविदा मागवल्या आहेत. मर्झबान रोडवर 88 तर सोफिया महाविद्यालयाजवळील गल्लीत 91 वाहने पार्क करण्याची जागा उपलब्ध आहे.























































