चंद्रपूर शहरालगतच्या वीज केंद्र ते ताडोबा मार्गाला जोडणाऱ्या भागात वाघाची जोडी दिसली. सोमवारी रात्री या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना वाघ जोडीचे दर्शन झाले.
पावसाळा ऐन भरात असताना अशा पद्धतीने वर्दळीच्या रस्त्यावर वाघाच्या जोडीचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. याच भागातून आसपासची गावे व कोळसा खाणीच्या प्रकल्पांकडे जाण्याचा मार्ग आहे. वर्दळीच्या या मार्गावर वाघ जोडीच्या दर्शनाने वनविभाग सतर्क झालाय. वाघ जोडीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभाग सरसावला आहे.
View this post on Instagram























































