
सोलापूरचे इतिहास अभ्यासक व वस्तुसंग्राहक नितीन अणवेकर यांनी देश-विदेशातील टपाल तिकिटे व माचिस बॉक्स यांचा संग्रह केला आहे. या संग्रहाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटी या संस्थेने घेतली असून नितीन अणवेकर यांना एशियन रेकॉर्ड करण्याचा बहुमान प्रदान केला आहे.
नितीन अणवेकर यांना लहानपणापासून ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे 180 देशांची 72 हजार टपाल तिकीटं आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंतचे विविध प्रकारचे 23 हजार 500 माचिस बॉक्स आहेत. त्यांच्याकडे नाणी, देश-विदेशातील नोटा, विविध प्रकारचे कुलूप, अडकित्ते, ग्रामोफोन, घडय़ाळे, मोडी कागदपत्रे आदींचा मोठा संग्रह आहे.






























































