कश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची पुन्हा सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुलवामाच्या नदिमर्ग येथे 2003 मध्ये 24 कश्मिरी पंडितांच्या झालेल्या सामूहिक हत्याकांडाच्या खटल्याची पुन्हा सुनावणी होणार आहे. जम्मू-कश्मीर उच्च न्यायालयाने शुक्रवारी यासंदर्भात आदेश दिला. उच्च न्यायालयाने यापूर्वी दोन वेळा पुनर्विचार याचिका फेटाळली होती. मात्र राज्य सरकारच्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार न्यायमूर्ती संजय धर यांनी पुनर्विचार याचिका फेटाळण्याचा 11 वर्षांपूर्वीचा आदेश मागे घेतला आहे. त्यामुळे हत्याकांडाच्या खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.