मुंबईतील शिवसेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

बाबूराव माने यांची लोकसभा निरीक्षकपदी (दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा), मनोहर केदारी रायबागे यांची विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी (धारावी विधानसभा), तर हरदीप सिंग अहुलवालिया यांची विधानसभा निरीक्षकपदी (वडाळा विधानसभा) नियुक्ती केली आहे.